राशीभविष्य, शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी :-
शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रगती होईल. शुभ रंग – पिवळा.
वृषभ राशी :-
दिवस चांगला जाईल. शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. पैशांचा वापर काळजीपूर्वक करा. शुभ रंग – निळा.
मिथुन राशी :-
घरच्यांना वेळ द्याल. दिवस आनंदात जाईल. तब्येतीची काळजी घ्यावी. मिष्टान्न योग आहे. शुभ रंग – केशरी.
कर्क राशी :-
तब्येत सांभाळा. प्रवासाचा आणि चविष्ट पदार्थ खाण्याचा योग. ओळखीतल्यांची साथ लाभेल. हुशारीने यशस्वी व्हाल. शुभ रंग – पांढरा.
सिंह राशी :-
धावपळ करावी लागेल. तब्येतीला जपा. ओळखीतल्यांसाठी वेळ काढणे हिताचे. खर्च करताना संयम राखा. शुभ रंग – लाल.
कन्या राशी :-
गोड बोलाल तर प्रगती कराल. हुशारीने वागाल तर यशस्वी व्हाल. घरच्यांना वेळ द्याल. शुभ रंग – निळा.
तूळ राशी :-
दिवस मजेत जाईल. मिष्टान्न योग आहे. हुशारीने प्रगती कराल. शुभ रंग – पांढरा.
वृश्चिक राशी :-
आर्थिक प्रगती होईल. आनंदी राहाल. घरच्यांना वेळ द्याल शुभ रंग – पिवळा.
धनु राशी :-
संयम आणि विश्वास यांच्या जोरावर कमाल कराल. शब्द आणि पैशांचा सुयोग्य वापर यामुळे यशस्वी व्हाल. तब्येत सांभाळा शुभ रंग – हिरवा.
मकर राशी :-
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन हिताचे. शुभ रंग – पांढरा.
कुंभ राशी:-
नियोजनाने प्रगती कराल. दिवस मजेत जाईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. शुभ रंग – निळा.
मीन राशी :-
कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. बढतीचा आणि प्रगतीचा योग दिसतो. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग – लाल.