मेष : आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बोलताना वाणीत गोडवा ठेवाल. गायक लोकांचे कौतुक केले जाईल. झोपेची तक्रार जाणवेल. चटपटीत पदार्थ चाखाल.
वृषभ : आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे. सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वागणूक प्रेमळपणाची असेल. आल्या-गेल्याचे उत्तम स्वागत कराल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. प्रलोभनाला बळी पडू नका.
मिथुन : आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. जोडीदाराच्या सौख्यात रममाण व्हाल. स्पष्टपणे बोलणे टाळावे. फसवणुकीपासून सावध सहा. मानसिक चंचलता जाणवेल.
कर्क : आज द्विधा मनःस्थितीमुळे आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मुलांच्या कला गुणांचे कौतुक कराल. हौस मौज पूर्ण करून घ्याल. स्त्रियांच्या सहवासात वावराल.
सिंह : आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल. कामे मनाजोगी पार पडतील. मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. जोडीदाराबरोबर मनमोकळी चर्चा कराल. काही कामे अकारण खोळंबतील. वात-विकाराचा त्रास जाणवेल.
कन्या : आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. परोपकाराचे महत्व समजून घ्याल. धार्मिक कामात हातभार लावाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सर्वांना सहृदयतेने मदत कराल. नातेवाईकांशी विसंवाद टाळावा.
तूळ : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. कामातून समाधान शोधाल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळच्या नातेवाईकांची नाराजी दूर करावी. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत.
वृश्चिक : दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. मित्रा मंडळींचा गोतावळा जमा कराल. उत्तम गृह सौख्य लाभेल. पत्नीचे विचार आग्रही वाटू शकतात. प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल.
धनू : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. नोकर-चाकरांचे सौख्य मिळेल. भावंडांची मदत घेता येईल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. आपल्या काही गोष्टींचे परिक्षण करावे.
मकर : आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. व्यावहारिक बुद्धिमत्ता वापरावी. काही गोष्टींचा सारासार विचार करावा. फार खोलात जाऊन अर्थ काढू नयेत. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात. अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल. तुमचा अंदाज बरोबर ठरेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. सामुदायिक भानगडीत लक्ष घालू नका. नसत्या वादविवादात अडकू नका.
मीन : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. मित्रांशी मतभेद संभवतात. दिवसभर कामात व्यग्र राहाल. कानाच्या विकारांवर वेळीच उपाय करावेत. कष्टाला मागे पुढे पाहू नका. फसव्या लोकांपासून दूर राहावे. (Today Rashi Bhavishya, 9 March 2023)