भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावाच्या शिवारातील शेतातील विहिरीजवळ २७ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात निरू भीमसिंग उर्फ जाड्या बारेला (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. १२ मे २०२२ रोजी पीडित विवाहित महिला ही पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेली होती. यावेळी निरू भीमसिंग हा देखील विहीरीवर पाणी भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पीडित महिलेस मागुन पकडुन तिच्यावर बलात्कार केला. पीडिता आरोळ्या मारीत असंताना निरू याने चापटांनी मारुन ओरडु नको नाहीतर तुझा गळा कापुन टाकीन असा दम विवाहितेला दिला. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात निरू भीमसिंग उर्फ जाड्या बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सपोनी चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.
















