जळगाव (प्रतिनिधी) शहरात मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल सुरु करत करीत असून त्यामध्ये तुम्हाला भागीदार बनवतो, असे अमिष दाखवून मोहम्मद शोएब अब्दुल सत्तार शेख (वय ३०, रा. शाहूनगर) यांची मोहसीन गुलाब पिंजारी (रा. संगम बेकरीजवळ) याने २० लाखात गंडविले. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शाहुनगर नुरानी मशीदी जवळ मोहम्मद शोएब अब्दुल सत्तार शेख (वय ३०) कुटूंबीयांसह वास्तव्यास असून जळगाव शहरात हॉटेलचा व्यवसाय करतात. दि. १५ जून ते दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी दरम्यान, मोहसीन गुलाब पिंजारी यांनी मोहम्मद शोएब अब्दुल सत्तार यांनी मला आरआर शाळेजवळील पगारिया यांच्या जागेत हेल्थ पल्स हॉस्पिटल टाकायचे आहे. तुम्हाला त्यामध्ये भागीदार करतो, त्यासाठी मला पैसे कमी पडत असल्याने तुम्ही पाच महिन्यांसाठी मला ७लाख रुपये द्या असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास पटल्याने मोहम्मद शोएब यांनी त्यांना दि. १५ जून रोजी अॅड. प्रशांत बाविस्कर यांच्याकडून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हातउसनवारीने पावती तयार करुन प्रॉपर्टीच्या नावाने दुसऱ्या मित्राला गंडविले
हॉटेल व्यवसायीक शोएब शेख सत्तार याला १४ लाख ७३ हजारांचा गंडा घातल्यानंतर त्याचे मित्र वसीम अख्तर जमील अख्तर यांना प्रॉपर्टीचा बहाणा करुन त्यांच्याकडून दोन लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर चार लाख रुपये रोख स्वरुपात मोहसीन गुलाब पिंजारी यांना दिले आहे. त्यामुळे दोघांची एकूण २० लाख रुपयात गंडविण्यात आले असल्याचे उघड झाले आहे.
कुटुंबियांसह निघून गेले कोठेतरी मोहम्मद शोएब हे पैशांसाठी
मोहसीन पिंजारी यांच्या दुकानावर गेले, मात्र त्यांचे दुकान बंद होते. त्यामुळे ते मोहसीन यांच्या घरी गेले असता, तेथील नागरिकांनी मोहसीन हा परिवारासह कोठेतरी निघून गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याखात्री होताच, मोहम्मद शोएब अब्दुल सत्तार शेख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मोहसीन गुलाब पिंजारी रा. संगम बेकरीजवळ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल तायडे करीत आहे.
सुरुवातीला दिले १४ लाख हातउसनवारीने
सुरुवातीला मोहसीन पिंजारी याने मोहम्मद शोएब यांच्याकडून सुरुवातीला १४ लाख ७३ हजार रुपये हात उसनवारीवर घेतले. पैसे उसनवारी मागून ते हॉस्पीटलसाठी गुंतवणुक केल्याचे खोटे सांगत लवकरच दुप्पट इन्व्हेस्टमेंट नाही तर, उत्पन्नात वाटा अशा भुलथापा देत शोएबला झुलवत ठेवत त्याच्या श्रीमंत आणि गुंतवणुक करण्या योग्य मित्रांना जोडण्याचा सल्लाही देण्यात आला.