कोलकाता (वृत्तसंस्था) दुसरीही मुलगी झाली म्हणून नवऱ्याने बायकोच्या गुप्तांगात रॉड घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) वर्धमान पूर्व भागात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमानमध्ये कालना निवुजी कंपनीडांगा परिसरात राहणाऱ्या शरीफा बिबीचा विवाह 2016 मध्ये बागनापारा बिजारा भागातील तौफीक शेख याच्याशी झाला होता. पहिल्या मुलीच्या जन्मानंतरही सगळं काही सुरळीत होतं, मात्र दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तिचा छळ सुरू झाला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, मुलगा न झाल्यामुळे पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवल्याचा आरोप आहे. महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी पती तौफीक शेख याला अटक करून रविवारी कालना उपविभागीय न्यायालयात हजर केले. आरोपी पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 498ए/307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेला आधी दोन्ही मुलीच आहेत. दुसरी मुलगी झाल्यापासून तिचा छळ केला जात होता. दुसरीकडे, पीडितेची सासू रेणुका शेख हिने सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.