चाळीसगाव (दिलीप घोरपडे) अनेक लहान बालके तरुण वृद्ध पोहायला शिकले अनेकांना मी अत्यंत उत्कृष्ट निरोगी आयुष्य दिले काहींना तर हृदयविकारापासून मुक्त केले तर काहींना अस्थमा सारख्या कठीण आजारातून मुक्त केले. अनेक जलतरणपटू अनेक खेळाडू येथे सराव करून तयार झालेत मी चाळीसगावचा जलतरण तलाव…!
समस्त चाळीसगाव तालुका वाशिय क्रीडापटू हौशी खेळाडू जलतरणपटू आणि आपल्या आरोग्याची जाणीवपूर्वक काळजी घेणाऱ्या शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राजकीय-सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या बंधुंनो मी अनेक वर्ष चाळीसगावकरांच्या सेवेत अविरतपणे अत्यंत आनंदाने आणि दिलखुलासपणे काम केले. माझ्या ठाई अनेक लहान बालके तरुण वृद्ध पोहायला शिकले अनेकांना मी अत्यंत उत्कृष्ट निरोगी आयुष्य दिले काहींना तर हृदयविकारापासून मुक्त केले तर काहींना अस्थमा सारख्या कठीण आजारातून मुक्त केले. अनेक जलतरणपटू अनेक खेळाडू येथे सराव करून तयार झालेत मी चाळीसगावचा जलतरण तलाव (स्विमिंग टॅंक) चाळीसगाव शहरात तसे हौशी खेळाडू व्यायाम पटू अनेक आहेत. अनेक लोक माझ्या सहवासात आलेत मनमुराद आनंद घेतला आणि उत्तम आरोग्याचे धनी झालेत मी चाळीसगाव करांच्या सेवेत १९९७ पासून आलो स्वर्गीय लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या प्रयत्नातून या शहरात मी कार्यरत झालो. त्यांचा एक हौशी प्रकल्प म्हणून माझी संपूर्ण जळगाव जिल्ह्याला ओळख आहे.
चाळीसगावचे जलतरणपटू क्रीडापटू महाराष्ट्रात कुठेही गेले तर मोठ्या गर्वाने सांगायचे की, आमच्या गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव आहे आम्ही तिथे पोहोचतो हे चाळीसगाव शहराच्या दृष्टीने माझे वैभवच होते. चाळीसगाव तालुक्यात असलेल्या अनेक वैभवाच्या गोष्टींमधला मी एक वैभव शाली जलतरण तलाव माझ्या सहवासात वय वर्ष ५ च्या बालांपासून ते वय वर्ष ८५ पर्यंतचे वृद्ध नियमीत पोहण्याचा व्यायाम करत असत अनेक वर्ष अत्यंत वैभवात काढलेला मी अनेक व्यापारी उद्योजक राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या सहवासात असलेला मी आज मात्र मरणासन्न अवस्थेत आहे. माझी व्यथा कुणी ऐकेल का जागतिक महामारी कोरोना जशी सगळ्यांनाच हानिकारक ठरली तशी मला देखील ठरली. कोरोना काळात माझ्या प्रवेश दाराला कुलूप लावण्यात आले आणि माझ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले. गेल्या दोन वर्षात माझ्याकडे साधे ढुंकूनही कोणी पाहिले नाही आज माझ्या अंगाखांद्यावर वृक्षवेली वाढत आहेत.
फरच्या तुटल्या आहेत जलशुद्धीकरण यंत्र नादुरुस्त झाले आहे. जलतरणपटूंच्या आवाजाने आणि बालगोपाळांच्या आरोळ्यांनी सतत गजबजलेला मी आज भयाण शांतता अनुभवतो आहे माझी व्यथा कुणाला सांगावी तर ती ऐकायला देखील इथे कोणी नाही या जागतिक महामारीतून आता संपूर्ण जग सावरत असताना भारत आणि महाराष्ट्र ही सावरत आहे. तेव्हा माझ्या या अवस्थेला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी कोणी पुढे येईल का आज मी आर्त हाक मारीत आहे. माझ्या संवर्धनाची जबाबदारी चाळीसगावकरांनी स्वयंस्फूर्तीने घ्यावी आणि चाळीसगाव शहरातील नगरसेवक लोकप्रतिनिधी जलतरण प्रेमी यांनी पुन्हा एकदा माझे वैभव मला परत करावे. मी इमानेइतबारे आपली सेवा करेल मात्र, आज मला तुमच्या मदतीची गरज आहे ती जर केली तर भावी पिढीच्या तरुणांना बालकांना पुन्हा मनमुराद पोहण्याचा आनंद मी नक्कीच देईन आणि चाळीसगाव शहराचे नाव लौकिकात भर घालेल आपल्या प्रतीक्षेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव चाळीसगाव
दिलीप गणसिंग घोरपडे (7745024271)
चाळीसगाव
माजी अध्यक्ष, स्विमींग असोशीय चाळीसगाव