जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला माझ्यासोबत लग्न कर नाही तर तुला पेट्रोल टाकून मारुन टाकेल, अशी धमकी दिल्याचा खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात अविनाश प्रल्हाद देवरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन पिडीता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीता आपल्या अंगणात उभी असतांना अविनाश देवरे हा आला. त्याला पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना सुध्दा ती ओट्यावर उभी असतांना तिचा हात धरुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच तिला म्हणाला की, तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर, मी तूला पेट्रोल टाकून मारुन टाकेल, अशी धमकी दिली. पिडीतेची आईने त्याला हटकले असता, तो घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अविनाश देवरेविरुद्ध विनयभंगसह पोस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील सपोनि दिलीप राठोड हे करीत आहेत.