TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर… गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) “राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकले असते तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती”, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना उद्देशून लगावला. गिरीश महाजन यांनी भविष्यात युतीची सत्ता पुन्हा येऊ शकते, भविष्याचं काही सांगता येत नाही, असा चिमटा गुलाबरावांसमोर काढला.

महापालिकेच्यावतीने शनिवारी दुपारी आयोजित केलेल्या केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्यात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते. यावेळी दोघांनी आपल्या भाषणात एकमेकांना राजकीय चिमटे घेण्याची संधी सोडली नाही. या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, लता सोनवणे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेच्यावतीने सुप्रिम कॉलनीतील गजानन महाराज मंदिराजवळ उभारण्यात आलेली अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

गिरीश महाजनांचे चिमटे

आपल्या भाषणात गिरीश महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार चिमटे घेतले. ते म्हणाले, आज सुप्रिम कॉलनीत अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचे लोकार्पण होत आहे. या परिसरात शिवसेनेचे अवघे तीन नगरसेवक आहेत. महापालिकेत आमचे संख्याबळ जास्त आहे. पण आम्ही दुजाभाव केला नाही. हे राज्यात आदर्श ठरणारे उदाहरण आहे. पण राज्यात असे घडले नाही. आमच्या मतदारसंघाचे पैसे तुम्ही पळवले. सत्ता आपली आहे, काल तुमची सत्ता होती. उद्या आमची सत्ता असेल, काही सांगता येत नाही. उद्या-परवा आपली सत्ता असेल. आज तर मला याठिकाणी युतीची सत्ता आहे, असेच वाटतेय. भविष्यात काय घडेल, हे सांगता येत नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

महाजनांना गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

गिरीश महाजन यांच्यानंतर भाषणाला आलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार कोटी केली. गुलाबराव पाटील म्हणाले, आज सत्ता आहे, पण उद्या कोणाची सत्ता येईल, हे सांगता येत नाही. गिरीश महाजन यांनी महापालिकेत कशी सत्ता आणली, हे मला चांगले माहिती आहे. त्यांनी जी रसद पुरवून सत्ता आणली ती रसद आमच्याकडे नव्हती. त्यांनी राज्यात जे केले, तेच महापालिकेतही केले. तेव्हा जर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकले असते तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती. पण ते आपल्या हातात नाही. वरचे लोक काय करतात, कार्यकर्ता म्हणून जो रोल आपल्याला दिला जातो, तो आपल्याला करावा लागतो, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

आव्हानी येथे रक्तदान करून शिवजयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात निष्ठावान शिवसैनिकाची आत्महत्या

October 3, 2021

लेकीचा फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांची भावुक पोस्ट ; वादात लेकीलाही ओढल्याची व्यक्त केली खंत !

November 13, 2022

धरणगाव स्टेट बँकेसमोर एकाला जबर मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा !

April 22, 2023

आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली सुरेशदादांची भेट ; चर्चेचा तपशील गुलदस्त्यात !

March 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group