जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्याशी काहीही संबंध नसतांना माझ्यासह एका मित्राकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘त्या’ अश्लील कृत्याची फाईल मिळवण्यासाठी बेकायदेशीररित्या झाडाझडती घेतल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रफुल्ल लोढा यांनी आज केला. धक्कादायक म्हणजे याप्रकरणी त्यांनी थेट स्व:पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. ते आज एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेत लोढा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले. परंतु एकनाथराव खडसे यांच्या जोडीला असलेला पारस लालवाणी यांने मला धमकावून माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड करेल व माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रीचे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. ‘त्या’ अश्लील कृत्याची फाईल मिळवण्यासाठी पोलिसांकडून बेकायदेशीर घर झडती घेत झालेल्या अन्यायाची दाद मी आता न्यायालयात मागणार आहे. बीएचआर पतसंस्थेतच्या घोटाळ्याशी माझा मित्र सुनील कोचर (रा. सिल्लोड) व माझा चुलत भावाची पत्नी मनीषा अजय लोढा (रा.मुंबई) यांचा कोणताही संबंध नसताना खडसे व ललवाणी यांनी माझ्याकडे असलेली गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्या गैर कृत्याची फाईल शोधण्यासाठी माझ्याकडे व माझ्या चुलत भावा लोढा यांच्याकडे बीएचआर पतसंस्थेच्या नावाखाली घरझडती घेण्यात आली. तसेच गिरीश महाजन व रामेश्वर नाईकच्या गैरकृत्याची फाईल प्रफुल्ल लोढाने तुमच्याकडे ठेवली आहे. त्या फाईल द्या, म्हणून कायद्याचे कोणतेही बंधन न पाळता न्यायालयाची संपूर्ण दिशाभूल करून सुनील कोचर व मुंबईचे लोढा भवन येथे २७ नोव्हेंबर रोजी सर्च वॉरंट काढून झाडाझडती घेतली. तर १ डिसेंबरला कुठलेही सर्च वॉरंट नसताना घर झडती घेण्यासाठी आलेले आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी लोकांना धमकावत होते व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होते. कोर्टाची परवानगी नसताना सहा ते आठ तास कोचर यांच्या घरात आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व पारस ललवाणीने गोंधळ घातला. तसेच मोबाईलमधील संभाषण अधिकाऱ्यांनी उडविले. एकनाथराव खडसे मला सांगत होते की, मी बघितलेले गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांची फाईल मला दे. मी त्यांना म्हटले राजकारणातील विकृती संपवण्यासाठी मी पुरावे गोळा केले आहेत. परंतु त्याचा फायदा मी राजकारणासाठी निरपराध लोकांचा बदनामी होऊ देणार नाही. या संदर्भात संपूर्ण चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपती, राज्यपाल यांच्याकडे खोट्या झाडाझडतीच्या कारवाईबद्दल दाद मागणार आहे, असल्याचेही लोढा म्हणाले. लोढा यांनी यावेळी खडसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले.