एरंडोल (प्रतिनिधी) आयशर वाहनात निदर्यीपणे गुरे कोंबून ते कत्तलीच्या उद्देशाने घेवून जाणारे वाहन शनिवारी रात्री धरणगावसह एरंडोलच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र राजेंद्र माळी (रा. बिलाडी रोड, बिलाडी रोड, देवपुर धुळे), आबा बजरंग पाटील (देवपुर धुळे) आणि इमरान कंजा कुरैशी (कटन मार्केट, पारोळा), असे संशयित आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी श्रीपाद शंभुप्रसाद पांडे (वय 42 वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. वाणी गल्ली, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 25 रोजी रात्री 9 वाजेच्या मित्र अजिंक्य काळे याचा फोन आला आणि त्याने सांगितले की, एरंडोल शहरातील कासोदा नाका येथे एक आयशर गाडी (क्र.- MH-18 BG-7040) हीच्यात गाई व लहान वासरे ही जिवंत दोराच्या सहाय्याने बांधून कत्तलीसाठी नेण्याचे उद्देशाने निष्काळजीपणे कोंबून ठेवली आहेत. या घटनेची माहिती मिळताच श्रीपाद पांडे हे एरंडोलचे मित्र आकर्ष तिवारी, संजय छगन महाजन यांच्या सोबत पोहचलो. तेव्हा तेथे अजिंक्य काळे, निरज अतुलकुमार जगताप, चंद्रकांत सुरेश पारखे हे देखील उपस्थित होते.
काच फुटलेल्या आयशर गाडी (क्र.- MH-18 BG- 7040) मध्ये निर्दयीपणे गुरे बांधून ठेवण्यात आलेली असल्याचे दिसून आलीत. याबाबत आयशरमधील व्यक्तींना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. यामुळे श्रीपाद पांडे यांच्या घटनास्थळी उपस्थित लोकांनी आयशर गाडीतील लोकांची विचारपूस केली असता त्यांनी आपला परिचय रविंद्र राजेंद्र माळी (वय 36 वर्षे रा. मानव केंद्राच्या बाजुला, वारे नगर, बिलाडी रोड, देवपुर, धुळे, ता. जि. धुळे), आबा बजरंग पाटील (वय 45 वर्षे रा. दुर्गा माता मंदीराजवळ, विटा भट्टी, देवपुर, धुळे, ता. जि. धुळे) तसेच इमरान कंजा कुरैशी (वय 24 वर्षे ह. मु. कॉटन मार्केट, पारोळा रोड, धुळे, ता. जि. धुळे मुळ रा. मोहल्ला गोपालपुरा, वॉर्ड नं.-22, शमशाबाद, आगरा, उत्तर प्रदेश) असा सांगितला. यानंतर आयशर वाहन एरंडोल पोलीस स्थानकात नेण्यात आले. आयशर वाहन आणि गुरे असा एकूण लाखोंचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस करीत आहेत.