धरणगाव (प्रतिनिधी) येथील दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत आज आदिवासी दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधवांकरिता असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली.
येथील दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आज जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, माळी समाजाचे युवानेते लक्ष्मण माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे समीर भाटिया उपस्थित होते. यावेळी आदिवासी बांधवांकरिता असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.