धरणगाव (प्रतिनिधी) येथे आज जळगाव जिल्हा स्तरीय ओबीसी परिषद नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
देशभरात ओबीसीच्या प्रश्नावर राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात तर ही झळ ओबीसी समाजाला होताना दिसते आहे. हक्काचे आरक्षण काढून टाकण्याचे प्रयत्न होता आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर आदेश काढण्यात आले आहे. हे सर्व का आणि कशामुळे घडते आहे?, हे सर्वांना सामुदायिकरित्या समजून घ्यायला हवे व एकता अधिक मजबूत करायला हवी, यासाठी सक्रिय सहभागासह जळगाव जिल्हा स्तरीय ओबीसी परिषद घेण्याचे मानस आहे व यासाठी प्रतिभा ताई शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
ह्या सभेला ज्येष्ठ ओबीसी नेते व महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ, राज्याचे सामाजिक सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, ज्येष्ठ धनगर समाजाचे नेते रामहरी रुपणा हे उपस्थित राहणार आहेत.
हि परिषद दि. २५ सप्टेंबर शनिवार रोजी घेण्याचा मानस असून ह्याच्या पूर्व नियोजनाची ही बैठक आहे. दि. १९ सप्टेंबर २०२१ रविवार रोजी सायंकाळी ७ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. असे श्री संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळतर्फे कळविले आहे.