TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

vijay waghmare by vijay waghmare
August 30, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

तिरुचिरापल्ली, २९ ऑगस्ट (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद – राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (आयसीएआर – एनआरसीबी), तिरुचिरापल्ली यांच्यात केळी पिकावरील फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही (क्युकुम्बर मोजेक व्हायरस) या प्रमुख रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे केळीच्या बागेत येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन कार्य वाढीस लागेल. या करारावर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन आणि जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी स्वाक्षरी केल्या.

करारानंतर बोलताना डॉ. सेल्वराजन म्हणाले, “जैन इरिगेशन गेल्या ३५ वर्षांपासून केळी पिकावर सातत्याने काम करत आहे. कंपनीने टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाद्वारे विषाणूमुक्त (व्हायरस फ्री) रोपे विकसित केली आहेत, ज्यामुळे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. मात्र, जळगावसह अनेक जिल्ह्यात फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही रोगांचे संकट गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाले आहे. केळीवरील हे रोग जगभरातील केळी व्यवसाय आणि शेतीला मोठ्या प्रमाणात प्रभावित करताना दिसत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) प्रकल्पा अंतर्गत हा करार करून यावरील संशोधनास चालना देण्यात आली आहे. या सहकार्य करारामुळे आम्हाला एकत्रितपणे रोग नियंत्रणाच्या नवीन पद्धती विकसित करण्यास चालना मिळेल.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

जैन इरिगेशनने शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या जागतिक पातळीवर कार्य केले आहे. त्याच प्रमाणे शेती, पाणी आणि पर्यावरणासंदर्भात जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांचे कार्य सर्वश्रृत आहे. त्यांच्या दूरदृष्टीने साकारलेले टिश्युकल्चर तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व गुणवत्तावाढी बरोबरच केळी फळाच्या निर्यातीला विशेष चालना मिळाली आहे.

या करारा अंतर्गत होणाऱ्या संशोधनातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना फ्यूजारियम विल्ट व सिएमव्ही सारख्या घातक रोगांचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. यामुळे जळगाव सह महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीवरील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येऊ शकेल. या संशोधन कार्य मधे केळी उत्पादकाच्या शेतावर सुद्धा संशोधन करता येईल.त्यामुळे शेतकऱ्यांचा रोग नियंत्रणावरील खर्च कमी होवून उत्पादन वाढीबरोबरच आर्थिक स्थैर्य मिळेल. या करार प्रसंगी ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. पी. गोविंदराज व जैन इरिगेशनचे डॉ. अनिल पाटील आणि डॉ. एस. नारायणन उपस्थित होते.

फोटो ओळ– जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपस्थित जैन इरिगेशनचे डॉ.के.बी.पाटील, अनिल पाटील सोबत डॉ.आर.सेल्वराजन यांच्यासह इतर मान्यवर.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

भरदिवसा साडेपाच लाखांची घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी व व्हीजे-एनटी यांचे आरक्षण समर्पित घटित आयोग २२ मे रोजी नाशिक विभागीय दौऱ्यावर

May 13, 2022

धरणगावात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देणार : जितेंद्र महाजन यांचा ईशारा !

January 27, 2024

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे शोषण तातडीने थांबवा – फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

November 10, 2020

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडीलांना कोरोनाची लागण ; उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल

April 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group