TheClearNews.Com
Saturday, November 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चा ळीसगाव तालुक्यात विहिर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणे भोवले !

पंचायत समितीचे ३ कर्मचारी कार्यमुक्त तर ७ तांत्रिक सहाय्यक यांना बिडीओंची कारणे दाखवा नोटीस !

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पंचायत समिती मधील मनरेगा कक्षातील कर्मचारी यांनी तालुक्यातील ४००० सिंचन विहीर मंजुरी व बिले काढण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांकडून प्रत्येकी २० ते ३० हजार रुपये घेतले असल्याचा आरोप करत तक्रारदार शेतकऱ्यांसह पंचायत समितीला धडक दिली होती. तसेच पैसे मागणाऱ्या कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे सांगत ज्या शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यात आले आहेत त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. शेतकऱ्यांकडून पैसे वसुली या कर्मचार्ऱ्याना भोवले असून आमदार मंगेश चव्हाण यांच्या आक्रमक पावित्र्याची दखल घेत पंचायत गटविकास अधिकारी अ.अ.शेख यांनी मनरेगा कक्षातील राहुल अहिरे, विलास पाटील व संदीप रणदिवे या ३ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून जळगाव येथे हजर होण्याचे आदेश दिले आहेत तसेच मनरेगा कक्षातील तांत्रिक सहाय्यक राज पाटील, राकेश पाटील, राहुल पाटील, प्रसाद चौधरी, पंकज तायडे, धीरज मराठे, विष्णू महाले या ७ तांत्रिक सहाय्यक (TPO) यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. सदर पत्रात गटविकास अधिकारी यांनी सदर कर्मचारी यांना यापूर्वी देखील दिनांक २२ मार्च २०२५ व २३ एप्रिल २०२५ रोजी बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या मात्र तरीदेखील त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नसल्याची गंभीर बाब नमूद केली आहे.

सिंचन विहिरीसोबतच अभिसरण अंतर्गत गावागावांमध्ये बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक ची कोट्यवधींची कामे गेल्या २ वर्षात मंजूर करण्यात आली असून या कामांमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झाला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात तालुक्यात आहे. यात सहभागी असणारे तत्कालीन गटविकास अधिकारी व मनरेगा कक्षातील कर्मचारी आता आमदार मंगेश चव्हाण यांच्या रडारवर आहेत. पंचायत समिती मार्फत मनरेगा अभिसरण (Convergence ) अंतर्गत सन २०२३ – २४ व २०२४-२५ या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक ची कामे मंजूर केली गेली आहेत. या कामांच्या मंजुरी व बिल काढण्याच्या प्रक्रियेत पंचायत समितीचे त्यावेळेचे गटविकास अधिकारी व मनरेगा विभागातील कंत्राटी कर्मचारी यांनी संगनमताने व आपल्या अधिकारांचा गैरवापर करत मोठी अनियमितता केल्याच्या तसेच मंजूर कामे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. विशेषकरून काम अपूर्ण असताना देखील कुशल बिल रेकॉर्ड करणे, ग्रामरोजगार सेवक यांच्या सही शिवाय मस्टर मागणी करणे व मस्टर काढणे असे प्रकार झाले आहेत. तसेच अंदाजपत्रकापेक्षा कमी व निकृष्ट दर्जाचे काम झाले असताना देखील पंचायत समिती गटविकास अधिकारी व सबंधित मनरेगा कक्षातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक यांनी कुशल / अकुशल बिल रेकॉर्ड करून पाठवले आहेत. हा अनेक कोटींचा अपहार असून विहिरी सोबत या प्रकरणात देखील चौकशी होऊन गुन्हे दाखल होणार आहेत तसेच यात बडे मासे देखील अडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

READ ALSO

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

याबाबत आमदार चव्हाण हे या अभिसरण घोटाळ्याच्या संदर्भात रोहयो मंत्री भरत गोगावले, विधानसभा पंचायत राज समिती अध्यक्ष संतोष दानवे यांच्यासह मनरेगा महासंचालक, मनरेगा आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी लेखी तक्रार करणार आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांनी यापूर्वी कन्नड घाट स्टिंग ऑपरेशन, गुटख्याच्या ट्रकचा पाठलाग, RTO कडून वाहनचालकांची होणारी पिळवणूक याबाबत आवाज उठवला होता त्यावेळी सबंधित दोषी अधिकारी – कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली होती. सिंचन विहिरी मंजुरी हा शेतकऱ्यांशी सबंधित विषय असून आमदार चव्हाण यांची शेतकऱ्यांविषयी असलेला जिव्हाळा पाहता या प्रकरणात देखील ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत दोषींवर कारवाई होईपर्यंत थांबणार नसल्याचे दिसते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonIn Chalisgaon talukapeople were caught taking money from farmers for well approval!

Related Posts

चाळीसगाव

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

November 1, 2025
गुन्हे

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

November 1, 2025
गुन्हे

खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांना आश्रय देणारा जेरबंद !

October 31, 2025
गुन्हे

डोळ्यात मिरची पुड टाकून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

October 30, 2025
गुन्हे

कन्नडच्या महिलेची ९० हजारांची सोनपोत लंपास

October 29, 2025
गुन्हे

आमदार एकनाथ खडसेंच्या घरात चोरी ; 6 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज केला लंपास !

October 29, 2025
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाथाभाऊ मजबूत माणूस…तुम्ही कितीही छळ करा, मी झुकणार किंवा घाबरणार नाही !

August 30, 2021

धरणगाव येथे ह.भ.प. प्रा. सी.एस.पाटील सर यांचे दणदणीत जाहीर कीर्तनाचे आयोजन !

March 9, 2023

सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करा : मुख्याध्यापक अनिल महाजन

January 12, 2021

शतपावली पडली महिलेला महागात ; चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले !

February 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group