धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव येथे परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने दि.20 डिसेंबर ते दि.27 डिसेंबर 2023 पर्यंत श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ प्रहरे व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताकाळात दैनंदिन कार्यक्रम सकाळी 8.30 ते 10 सामुदायिक श्री गुरूचरित्र पारायण वाचन , दररोज आरती सकाळी 8 वाजता भूपाळी, सकाळी 10.30 वाजता नैवद्य आरती व संध्याकाळी 6 वाजता महानैवद्य आरती तसेच बालसंस्कार, गर्भ संस्कार, कृषी शास्त्र, वास्तुशास्त्र, व मानवी जिवनात येणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सप्ताह काळात अखंड 7 दिवस 24 तास प्रहरे श्री स्वामी समर्थ मंत्र माळ जप, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन, वीणा वादन व सर्व यागात सहभाग घेता येईल. 19 डिसेंबर मंगळवार ग्रामदेवता निमंत्रण व मंडल मांडणी. 20 डिसेंबर बुधवार मंडळ स्थापना अग्निस्थापना व स्थापित देवता हवन, 21 डिसेंबर गुरूवार नित्यस्वाहाकार श्री गणेश व मनोबोधयाग 22 डिसेंबर शुक्रवार नित्य स्वाहाकार श्री गीताई याग 23 डिसेंबर शनिवार नित्य स्वाहाकार श्री स्वामी याग 24 डिसेंबर रविवार नित्य स्वाहाकार श्री चंडीयाग 25 डिसेंबर सोमवार नित्य स्वाहाकार रुद्र व मल्हारी याग 26 डिसेंबर मंगळवार नित्य स्वाहाकार बलीपूर्णाहुती दुपारी 12.39. श्री दत्त जन्मोत्सव महाआरती 27 डिसेंबर. बुध वार सत्यदत्त पूजन देवता विसर्जन सप्ताह सांगता. तरी पंच क्रोशितील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने सप्ताह काळात सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव तालुक्याचे सेवेकरी परिवाराचा वतीने करण्यात आलेले आहे.