जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रेमचंद नगर भागामध्ये एका सत्यनारायण सिक्युरिटी फोर्स सुरक्षा एजन्सीच्या कार्यालयात वृद्धाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून मारून सुमारे १ लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, रोख रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता घडली. या प्रकरणी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील कमल पॅराडाईज हॉटेलच्या मागील बाजूस कृष्णकुमार विभूती सिंग (वय ७४, रा. ऑटो नगर, नाशिक), यांचे सत्यनारायण सिक्युरिटी फोर्स सुरक्षा एजन्सीचे ऑफिस आहे. दरम्यान कृष्णकुमार विभूती सिंग हे शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता त्यांच्या कार्यालयात असताना त्या ठिकाणी अज्ञात व्यक्ती आला. त्याने कृष्णकुमार यांना धक्काबुक्की करत त्यांच्या डोळ्यावर मिरचीची पावडर फेकून कार्यालयातून सोन्याची चैन, २६ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल असा एकूण १ लाख १३ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरी चोरून नेल्याची घटना घडली या घटनेनंतर कृष्णकुमार विभूती सिंग यांनी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातिर हे करीत आहे.