TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील दोघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2023
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील दोन जणांवर महसूल प्रशासनाने एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश दिले. निखिल उर्फ पिया सुनिल कुडे (वय २४, रा. एम.जे.नगर, चाळीसगाव) व शेख चॉंद शेख हमीद (३८, दीनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) अशी दोघांची नावे आहेत.

निखील उर्फ पिया सुनिल कुडे हा २०१८ पासून चाळीसगाव तालुक्यात विनापरवाना अवैधरित्या वाळूची चोरी करुन विक्री करीत होता. त्याच्यावर वाळू चोरीचे‌‌ ५ गुन्हे दाखल‌ होते. त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी मान्यता दिली. एमपीडीए अंतर्गत त्यास एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

चाळीसगाव शहर पो.स्टे. पो. निरीक्षक संदिप पाटील, पोउनि. सुहास आव्हाड, पोना विनोद विठ्ठल भोई, पोना तुकाराम चव्हाण, पोकॉ चत्तरसिंग महेर, पोकॉ/ दिलीप सत्रे, पोकों/प्रविण देवरे, पोकॉ/विजय पाटील, पोकॉ/ समाधान पाटील अशांनी त्यास दि.१७ जुलै रोजी ताब्यात घेवून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह जि. कोल्हापूर येथे दाखल केले आहे.

शेख चाँद शेख हमीद‌ हा २०१५ पासून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात साथीदारांसह खून करणे, जबरी चोरी करणे, अनैतिक देह व्यापार करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, फसवणूक करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा विविध प्रकारचे एकूण ११ गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मंजूरी दिल्याने त्यांच्या विरोधात एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहा. पो. निरी. हरिष भोये, पोहेकॉ आत्माराम भालेराव, पोहेकॉ सुनिल जोशी, पोहेकॉ विजय नेरकर, पोना रमन सुरळकर, निलेश चौधरी, तेजस पारिसकर, पोकॉ योगेश महाजन, सचिन चौधरी अशांनी त्यास दि.१७ जुलै रोजी ताब्यात घेवून नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे दाखल केले आहे. भुसावळ बाजारपेट पो.स्टे. कडील एमपीडीए प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, व भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता.

एमपीडीए कायद्यांतर्गत नोव्हेंबर २०२२ पासून आजपावेतो गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २३ गुन्हेगारांवर धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले व वाळू तस्कर या नियमाखाली नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा व कोल्हापूर या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याबाबतची कारवाई जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये करण्यात आलेली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

भुसावळात खळबळ : सहआरोपी न करण्यासाठी मागितली तीन लाखांची लाच ; पोलीस निरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांचा परवाना होणार निलंबित

October 20, 2020

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी धावणार ऑक्सिजन एक्स्प्रेस

April 18, 2021

महाराष्ट्रात लसीकरणाची गती मंदावल्यास कोरोनाची तिसरी लाट येईल ; तज्ज्ञांचा इशारा

April 29, 2021

दिलासादायक : खाद्यतेलात १५ रुपयांची कपात ; सरकारचे निर्देश !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group