धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जांभोरा येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते सकाळी ग्रामपंचायत कार्यालय सह गावांतर्गत काँक्रीटीकरण व महादेव मंदीर परिसरातील पेव्हिंग ब्लॉकचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अंतिम टप्यात असलेले तलाठी कार्यालय बांधकाम व पाणीपुरवठा योजनेची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी सुरुवातीला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने स्थापन होणाऱ्या वीर्य एकलव्यांच्या मूर्तीचे पूजन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी नांदेड येथील कुंभार समाजाचे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा. पं. सदस्य शुभम चव्हाण यांनी केले प्रास्ताविक युवा सेनेचे दीपक भदाने यांनी केले. तर आभार सरपंच अनिता गुजर यांनी मानले.
यांची होती उपस्थिती !
याप्रसंगी सरपंच अनिता वसंत गुजर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, विर एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव पंढरीनाथ मोरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख दीपक भदाने, उपसरपंच किशोर बोरसे, ग्रा. पं. सदस्य शुभम चव्हाण, सुरेश पाटील, सागर गुजर, परेज भिल, शाहरुख पटेल, भरत सैदाने, किशोर पाटील, अशोक अहिर, शाखाप्रमुख अमोल सोनवणे, जेष्ठ नागरिक रामदास गुजर गोटूशेठ काबरा, प्रताप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.