जळगाव प्रतिनिधी । गटारीचे सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा होवून एकमेकांना दगड मारून दुखापत केल्याची खळबळजनक घटना शिरसोली गावातील इंदीरा नगरात बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील इंदिरा नगरात गटारीच्या सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. यात एकमेकांवर तुफान दगडफेक करून दुखापत केली आहे. यात पहिल्या गाटातील उज्जवला रविंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यश विकास पाटील, कृष्णा ज्ञानेश्वर पाटील, धनंजय विकास पाटील, निशा ज्ञानेश्वर पाटील सर्व रा. इंदिरा नगर, शिरसोली, ता. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या गटातील जनाबाई रमेश पाटील वय ६५ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविंद्र सुकलाल पाटील, जिजाबाई सुकलाल पाटील, उज्ज्वला रविंद्र पाटील, रोशनी रविंद्र पाटील सर्व रा. शिरसोली.जळगाव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील हे करीत आहे.