TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहावीच्या परीक्षेत पी.आर.हायस्कूलच्या मुलींनी वाजवला वाड्या वस्तीतून गुणवत्तेचा डंका..!

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2023
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या मुलींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून अभ्यास करून मागासवर्गीय वाड्या वस्तीतून गुणवत्तेचा डंका वाजवला असून ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे ‘ ही उक्ती सार्थ केली आहे.

विशेष म्हणजे हे विद्यार्थी धरणगाव परिसराच्या चारही दिशांतले आहेत. शाळेतून ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम आलेली कु. पूर्वा दत्तात्रेय केले ही वाणी गल्लीची रहिवासी आहे. तिचे वडील अर्बन बँकेचे सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. ९३ टक्के गुण मिळवून द्वितीय आलेली कु. भाग्यश्री सुभाष सोनवणे ही वैदू वाड्यातील रहिवासी असून या समाजात प्रथमच एका मुलीने असे यश संपादन केले असावे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने अभ्यास करून व्हाॅलीबाॅल या खेळात ती राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली उत्तम क्रीडापटू आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

९३ टक्के गुण मिळवून द्वितीय आलेला अनुराग सुधीर शिंदे हा रोटवद या ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे. तर ९२.६० टक्के गुण मिळवून तृतीय स्थान पटकावणारी भाग्यश्री योगराज मोरे ही विद्यार्थिनी गौतमनगरच्या मागासवर्गीय वस्तीतील असून तिचे वडील मयत झाले आहेत. तर आई नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून सेवेत आहे. छोट्या मातीच्या घरात राहून तिने अभ्यास केला आहे. अनेक वक्तृत्व स्पर्धा तिने गाजवून बक्षीसे मिळवली आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शाळेने काॅपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबवून ९८ टक्के निकाल लावला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना अनेक दात्यांनी ठेवलेल्या ठेवीतून बक्षीसाची रक्कम मिळणार आहेच पण यंदा पासून शाळेच्या १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून १०० ग्रॅम चांदीचे बक्षीसही मिळणार आहे. शाळेचे माजी विद्यार्थी तथा राज्याचे अतिरिक्त आयकर आयुक्त श्री. विशाल मकवाने आणि बॅचच्या विद्यार्थ्यांनी हे दातृत्व स्वीकारले आहे. पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरूण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीया, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ पर्यवेक्षक कैलास वाघ आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

खळबळजनक : जळगाव SBI जबरी चोरीचा मुख्य सूत्रधार निघाला पोलीस अधिकारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवेकनिष्ठ वागणूक सर्व समस्यांचे समाधान – न्यायाधीश शेख

August 26, 2022

यजुर्वेंद्र महाजनांनी अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी साधला सवांद

September 6, 2021

धरणगाव रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकी लांबविली ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 20, 2022

कोरोना रुग्णांचं दु:ख समजू शकतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

May 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group