नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. पुन्हा एकदा ४० हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४१ हजार ३८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ५०७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. तर ३८ हजार ६५२ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ५०७ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ०९ हजार ३९४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी १२ लाख ५७ हजार ७२० कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०४ लाख २९ हजार ३३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४ लाख १८ हजार ९८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात ८ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात आज १६५ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३०,९१८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.
















