नवी दिल्ली(वृत्तसंस्था) भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे पण त्याच्या 20 टक्के वेगाने कोरोना रुग्ण बरे देखील होत आहेत. देशात कोरोनाबाधित अँक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होऊन आता ही संख्या सात लाखांपेक्षा कमी झाली आहे. आतापर्यंत 10 कोटी लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा एकूण पॉझिटिव्हिटी रेट 7.81 टक्के आहे आणि दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 3.8 टक्के आहे. अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात 54 हजार 366 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 690 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात 73 हजार 979 रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 77 लाख 61 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी एक लाख 17 हजार 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69 लाख 49 हजार जण आतापर्यंत बरे झाले आहे. शिवाय अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 6 लाख 95 हजारांवर आली आहे.
कोरोनाबाधित अँक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना व्हायरसचे अँक्टिव्ह रुग्ण, मृत्यू दर आणि रिकव्हरी रेटची टक्केवारी सर्वाधिक आहे. ICMR च्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबरपर्यंत कोरोना व्हायरसचे एकूल 10 कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 14 लाख नमुन्यांची तपासणी काल झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट चार टक्क्यांपेक्षा कमी आहे.
सर्वाधिक अँक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात
देशाच्या 22 राज्यं/ केंद्र शासित प्रदेशांमध्ये 20,000 पेक्षा कमी कमी अँक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यात 50 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंदी होत आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.अँक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. कोरोनाबाधितांच्या बाबतील भारत जगातील दुसरा सर्वाधिक प्रभावित देश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा नंबर आहे.
दिलासादायक बाबत म्हणजे मृत्यू दर आणि अँक्टिव्ह रुग्णांच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. मृत्यू दर कमी होऊन 1.51 टक्क्यांवर आला आहे. ज्या अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्यांचा दरही 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यासोबतच रिकव्हरी रेट म्हणजे बरं होण्याचा दर 89 टक्के आहे. भारतात रिकव्हरी रेट सतत वाढत आहे.