धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपरिषदेने मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या संकल्पनेने व लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिकांना कोरोना चाचणी शिघ्रगतीने तसेच सुलभतेने व्हावी यासाठी फिरते कोरोना चाचणी पथक आज रोजी सुरू केले. या पथकाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, नगरसेवक वासुदेव चौधरी, अजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील नागरिकांची घराजवळ, गल्ली मध्ये अथवा शक्य त्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्याच्या उद्देशाने हे पथक शहरात गस्त घालत आहे. तसेच ज्या नागरिकांना कोरोना चाचणी करायची असेल त्यानी नावाची नोंदणी केल्यास घरपोच सेवा देण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांचे वेळेवर निदान होवून उपचार होतील अशी अपेक्षा यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पथकाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सोशल मिडीयावर दिलेल्या लिंकद्वारे नाव नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.
या पथकात प्रभारी आरोग्य निरीक्षक प्रणव पाटील, शहर समन्वयक निलेश वाणी, आरोग्य मुकादम शेख शमशोद्दिन, हर्षल गुरव, अजय सोनवणे, गोपाळ चौधरी, विशाल पचेरवार, रिझवान शेख, रामकृष्ण महाजन, बुरहान शेख, अरुण पाटील यांचा समावेश आहे. पथकास उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती, सर्व सन्मा. नगरसेवक, नगरसेविका, आधिकारी व कर्मचारी वृंद यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.