चाळीसगाव (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून गाव तेथे शिवसेना घर तेथे शिवसैनिक या उद्देशाने शिवसेनेच्या सभासद नोंदणीला महाराष्ट्रभर जोमाने सुरुवात झाली. याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव शहरात आज शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना सभासद नोंदणी फार्म भरून सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमूख भिमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, माजी तालुकाप्रमुख धर्मा काळे, उपशहरप्रमुख शैलेंद्र सातपुते, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, उपतालुकाप्रमुख तुकाराम पाटील, संजय संतोष पाटील, एसटी कामगार सेनेचे रघुनाथ कोळी, वसीम चेअरमन आदी उपस्थित होते. येणाऱ्या काळात संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गण आणि गट नुसार सभासद नोंदणी सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे.