नाशिक (वृत्तसंस्था) कांद्याचे दर वाढविण्याचे षडयंत्र करत आणि कांद्याचे बेकायदेशीर साठे केल्याप्रकरणी १२ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात २० कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेत.
नाशिक जिल्ह्यात लासलगावमध्ये १० तर पिंपळगावात एका आणि नाशिक शहरात एका अशा १२ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारला. यावेळी संशयास्पद व्यवहार आढळल्याने काही व्यापारी रडारवर आले आहेत. दुसरीकडे लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. निर्यात बंदी केल्यानंतर देखील कांद्याचे दर वाढत असल्याने आयकर विभागाने कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारी केली आहे. त्याआधी लासलगाव बाजार समिती कांद्याच्या दरात वाढ केली होती.