TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्धेची पोत लांबवली !

vijay waghmare by vijay waghmare
April 17, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा.जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत हातचालाखी करीत एक तोळे सोन्याचे पोत चोरुन नेली. ही घटना दि. १५ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भजेगल्लीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील वरखेडीगावाजव असलेल्या जामनेगावात कस्तुरबाई लक्ष्मण पाटील या वृद्ध महिला वास्तव्यास आहे. दि. १५ रोजी सकाळी ८ वाजता बसने जळगावात राहणाऱ्या त्यांच्या मुलाकडे येण्यासाठी निघाल्या. नवीन बस स्थानकावर उतरल्यानंतर कस्तुरबाई या जूना खेडीरोडवरील दशरथ नगरात राहणारा त्यांचा मुलगा दशरथ पाटील याच्या भेटीकरीता जाण्यासाठी निघाल्या. भजेगल्लीतून मुलाकडे पायी जात असलेल्या वृद्ध महिलेला दोन अनोळखी इसमांनी थांबवले. यातील एक शरिराने जाड होता आणि त्याने डोक्यावर पांढरा रुमाल बांधलेला होता. तर दुसरा हा अंदाजे २० ते २५ वर्षाचा होता. त्यांनी वृद्ध महिलेच्या मागे जावून काही अंतरावर मावशी थांबा असे म्हणत थांबवले आणि त्यांनी एका मंदिराचा पत्ता विचारला. परंतू वृद्ध महिलेने त्यांना मला माहिती नाही असे सांगितले. महिलेने काढून दिली गळ्यातून पोत

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

पत्ता विचारणाऱ्यांनी कस्तुरबाई पाटील यांना म्हणाला की, तु आजारी होतीस तुझ्या कडून पैसे घेत नाही, तुला पोत मंत्रवून देतो, ती देवाऱ्यात ठेवायची असे म्हणत त्याने वृद्धेला गळ्यातील पोत काढायला लावली. वृद्धेने देखील गळ्यातील एक तोळ्याची पोत काढून त्या अनोळखी इसमाच्या हातात दिली.

मुलाच्या घरी न जाता गेल्या आईकडे
वृद्ध महिला ही मुलाच्या घरी न जाता भजेगल्लीतून थेट त्यांची राधाबाई बाजीराव पाटील रा. विठ्ठलपेठ, जनेगाव राजाराम मंगलकार्यालयाच्या समोर येथे गेल्या. त्यांनी कागदाची पुडी उघडून बघितली असता, त्यांना पोत दिसून आली नाही. त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांचा भाच्याला घरी बोलावून घेत संपुर्ण हकीकत सांगितली.

कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर पोलिसात धाव
कुटुंबियांना हकीकत सांगितल्यानंतर कस्तुरबाई पाटील यांना अनोळखी इसमांनी बोलण्यात गुंतवणून हातचालाखी करीत त्यांची पोत लांबवल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार दोघ अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातातील पुडी देवघरात सांगितली ठेवण्यास
त्या इसमाने वृद्धेला बोलण्यात गुंतवणुक ठेवत ती पोत कागदात गुंडाळत असतांना, त्याने खाली पडलेला दगड आण असे वृद्धेला सांगितले. त्यानुसार वृद्धेने रस्त्यावर पडलेला दगड उचलून तो त्या इसमाच्या हातात दिला. त्याने कागदात गुंडाळलेली पोत मंत्रावून झाली आहे. घरी गेल्यावर ती देवाऱ्यात ठेवून पुजा करुन ती पुडी उघड असे सांगत ते दोघे तेथून निघून गेले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

जैन इरिगेशनचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास श्री शिव छत्रपती पुरस्कार घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणिक घट; ३ महिन्यांनी मिळाला ‘हा’ दिलासा

October 27, 2020

पंजाबमध्ये भारतीय हवाई दलाचे ‘मिग-२१’ लढाऊ विमानाला अपघात, पायलटचा मृत्यू

May 21, 2021

प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना विनम्र आवाहन व महत्वाची सूचना

July 15, 2026

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ; तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ!

March 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group