जळगाव (प्रतिनिधी) ऑफिसमधले साहित्य परत मागितल्याचे वाईट वाटल्याने मनिषा दिनेश गवळे (वय ३१, रा. मेहरुण) या महिलेला काठीने मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दि. १३ रोजी मन्यारखेडा शिवारात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरुण परिसरात राहणाऱ्या मनिषा दिनेश गवळे यांचे पती दिपाली सुरवाडे यांच्यासोबत भाडेतत्वावर ऑफिस घेतले होते. ऑफिसमधील साहित्य घरी घेवून गेल्या आहेत. रविवारी मनिषा गवळे यांनी दिपाली सुरवाडे यांना ऑफिसमधील साहित्य परत मागितले. परंतू त्यांनी मला रविवारी सुट्टी असून सोमवारी या असे सांगितले. त्यानुसार गवळे हे सोमवारी गेले असता, त्यांना शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले.
मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा
मारहाण झाल्यानंतर मनिषा गवळे यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दिपाली बाळू सुरवाडे, बाळू सुका सुरवाडे, बेबीबाई बाळू सुरवाडे, सोनू शिवराम तायडे, राजेश बाळू सुरवाडे, चैताली अनिल बाविस्कर (सर्व रा. मन्यारखेडा शिवार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक हरिष पाटील करीत आहे.