जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – १७, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०९, अमळनेर-०१, चोपडा-०३, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-०४, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ९०६ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९१ रुग्ण सध्या उपचार घेताय.