नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात भारतीय सैन्याचं ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक होते. या दुर्घटनेत सैन्याचे दोन वैमानिक गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यातील एका वैमानिकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या सीमारेषेवर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. कठुआ जिल्ह्यातील लखनपूर येथे ही दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक होते. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एका वैमानिकाची प्रकृती गंभीर असून दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्घटना घडली आहे. HAL Dhruv हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं असून यामागे तांत्रिक कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे हेलिकॉप्टर पठाणकोट येथून येत होतं. कठुआचे एसएसपी शैलैंद्र मिश्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरला जिल्ह्यातील लखनपूर परिसरात लष्कराच्या जागेवर क्रॅश लँडिंग करावं लागलं.
दुर्घटनेच दोन वैमानिक जखमी झाले होते, त्यांना तात्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच ध्रुव हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.
















