TheClearNews.Com
Friday, July 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ घोषित; ‘मी अनाथांची माय झाले, तुम्ही सगळेजण गणगोत व्हा’ : सिंधुताई सपकाळ

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना समाजकार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘हा पुरस्कार माझ्या लेकरांना दोन घास पुरवण्यासाठी आहे, मी अनाथांची माय झाले, तुम्ही सगळेजण गणगोत व्हा’, अशा शब्दांत सिंधुताई यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च सन्मान असलेल्या पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. पद्मश्री पुरस्कारामध्ये फासेपारधी समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभूणे, सिंधुताई सपकाळ, जसवंतीबेन पोपट, नामदेव कांबळे, परशूराम गंगावणे यांचा समावेश आहे. ‘आजपर्यंत फाटलेले आयुष्य मी शिवत शिवत आले, टाके घातले तुम्ही सर्वांना दोरा दिला. अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. लाखो लेकरांना पदरात घ्यायचे आहे, तरच मला सुख मिळणार आहे. मी अनाथांची माय झाले, तुम्ही सर्व जण गणगोत व्हा, मायी तुमची आभारी आहे, असं म्हणत सिंधुताईंनी केंद्र सरकारचे आभार मानले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

“एकेकाळी रेल्वेत भीक मागून आणि स्मशानात झोपून मी दिवस काढले. पण तशी वेळ इतर महिलांवर येऊ नये यासाठी मी निर्धार केला आणि अनाथांची माय झाले”, अशा शब्दात त्यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. “मी माझं जीवन जगत गेले. चालत राहिले. फक्त त्यावेळी मी मागे वळून पाहिलं एवढंच… एकेकाळी नातलगांनी आणि मित्रपरिवाराने खांदा काढून घेतला होता. पण आज अख्खं जग मला खांद्याने आधार देत आहे”, असं त्या म्हणाल्या. “मला आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला याचाच अर्थ माझे खांदे अधिक मजबूत व्हावेत याचीच सरकारने काळजी घेतली आहे. हा पुरस्कार मला मिळेल याची मला कधी अपेक्षा किंवा कल्पनाच नव्हती”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

“मी अशी आहे तरी कोण? मी आपली हाफ टाईम मराठी चौथी पास…. नऊवारी जिंदाबाद… घेणं देणं नाही अशी अडाणी बाई… पद्मश्रीपर्यंत कशी जाऊ शकेल? माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे एका अर्थी धक्काच आहे”, इतक्या साध्या सरळ आणि सोप्या शब्दात त्यांनी पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली. तसेच, जीवन प्रवासात समाजातील ज्या साऱ्यांनी सढळहस्ते मदत केली, त्यांना त्यांनी पुरस्कार अर्पण केला.

केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालासुब्रमण्यम यांना देण्यात आला आहे. तर तरुण गोगोई आणि रामविलास पासवान, केशुभाई पटेल या राजकीय नेत्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण, तर दिवंगत गायक एसपी बालासुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

विविधतेत एकता ! गुगलन साकारलं प्रजासत्ताक दिनाचं खास डुडल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तिहेरी तलाक विरोधात लढणारी सायरा बानोचा भाजपात प्रवेश !

October 11, 2020

रोहित निकम यांची चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास सदिच्छा भेट !

August 29, 2024

मोटारसायकल घेण्यासाठी विवाहितेचा छळ

February 10, 2021

ब्रेकिंग न्यूज : गौतम अदानी यांच्या सिमेंट कारखाने, कंपन्यांवर छापेमारी !

February 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group