ओक्लाहोमा (वृत्तसंस्था) अमेरिकेत (America) पुन्हा एकदा गोळीबार (Open Firing) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील ओल्काहोमा येथील तुलसा परिसरात असलेल्या सेंट फ्रांसिस रुग्णालयात एका अज्ञात व्यक्तीने अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जण ठार झाले. नंतर पोलिसांनी या हल्लेखोरालाही ठार केले. या गोळीबारात अनेक जण जखमीही झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
ओक्लाहोमा येथील तुलसा हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात एका बंदुकधारीसह चार जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. तुलसा पोलीस विभागाने ट्विटरवर सांगितले की, अधिकारी अजूनही सेंट फ्रान्सिस हॉस्पिटल कॉम्प्लेक्स रिकामी करण्यासाठी काम करत आहेत. कॅप्टन रिचर्ड म्यूलेनबर्ग यांनी एबीसीला सांगितलं की, मेडिकल कॅम्पसमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रायफल असलेल्या एका व्यक्तीचा पोलिसांना फोन आला आणि त्या व्यक्तीने “एक्टिव्ह शूटर म्हणून गोळीबार सुरू केला” असे कळले.
म्यूलेनबर्ग म्हणाले की, अधिकारी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत “काही लोकांना गोळ्या घातल्या गेल्याचे त्यांना आढळले. एक जोडपे आधीच मरण पावले होते.” ते म्हणाले, “आम्हाला तो शूटरही मृत आढळला. आम्ही त्याला शूटर मानत आहोत कारण त्याच्याकडे एक लांब रायफल आणि एक पिस्तूल होती. संशयित हल्लेखोर व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.