धरणगाव (प्रतिनिधी) येथील रहिवासी तथा शहापूर जिल्हा ठाणे येथील दुय्यम निबंधक इंद्रवदन अभिमन्यू सोनवणे यांची महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरीय सहजिल्हा निबंधक तथा सहदुय्यम निबंधक या राजपत्रित पदावर पदोन्नतीने नियुक्ती केली आहे.
इंद्रवदन सोनवणे यांनी याआधी जळगाव,सावदा, धरणगाव,ओझर,निफाड अशा अनेक तालुक्यांत दुय्यम निबंधक म्हणून काम केले आहे.ते धरणगाव येथील रहिवासी असून त्यांचे वडीलही सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कार्यरत होते. परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करणाऱ्या सोनवणे यांनी या पदावर केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईने आपण पोहोचलो असल्याची भावना व्यक्त केली आहे. इंद्रवदन सोनवणे यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.