TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे : ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन !

जळगाव जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; प्रधानमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी गावकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून सर्व योजनांची माहिती लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे केले.

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘विकसित भारत संकल्प यात्रा रथ’ योजनांच्या प्रचार – प्रसिद्ध मोहीमेत आज जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले‌. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात जामनेर येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सर्वसामान्य नागरिक व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. खासदार उन्मेष पाटील हे चोपडा तालुक्यातील चांदसणी येथून व खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे मुक्ताईनगर येथून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आमदार, तालुक्यातील पदाधिकारी, जिल्हा प्रशासनातील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी,‌ तहसीलदार व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

ग्रामविकास मंत्री श्री महाजन म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासामध्ये गरुड भरारी घेतली आहे. देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचून देशाची प्रतिमा जगभरात उंचावत आहे. देशाच्या चौफेर विकासाबरोबरच विविध कल्याणकारी योजनांद्वारे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम करण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचे दूरदर्शी निर्णय घेण्यात येत आहेत. देशातील प्रत्येक घटकासाठी योजना आखण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या व बॅंकिंग योजनांचा लाभ पोहोचल्यास लाभार्थ्यांचा वैयक्तिक व कौटुंबिक विकास होणार आहे. जिल्ह्यातील २० ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात आले. थेट प्रेक्षपण ऐकण्यासाठी या गावांमध्ये गावकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, महिला, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.‌कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
Next Post

हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 13 नोव्हेंबर 2025 !

November 13, 2025

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२३ !

August 2, 2023

महावितरणचा कर्मचारी जाळ्यात ; संशय येताच लाचेची रक्कम फेकली !

May 3, 2024

रावसाहेब दानवेंची राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group