मुंबई (वृत्तसंस्था) शिवेसना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या पुत्रांच्या सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. यानंतर विहंग सरनाईक यांची ईडीने चौकशी केली होती. आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, प्रताप सरनाईक यांनी आज चौकशीला येऊ नसल्याचे ईडीला सांगितले आहे.
ईडीने प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची ईडीकडून तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली होती. प्रताप सरनाईकांना आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीकडून देण्यात आली होती. क्वॉरंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. यामुळे मला चौकशीला हजर राहता येणार नाही, असे प्रताप सरनाईक यांनी ईडीला सांगितले. यामुळे आता ईडीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लॉण्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली असून सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले.