जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात नवरात्र-दुर्गोत्सव 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. हा उत्सव धार्मिक स्वरुपाचा असल्याने या कालावधीत कत्तलखाने व बिफ मार्केट बंद ठेवण्याबाबत पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनास कळविले आहे.
त्यानुसार शनिवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी व सोमवार, दि. 26 ऑक्टोबर, 2020 रोजी विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण जिल्ह्यातील कत्तलखाने, बिफ मार्केट व मटन मार्केट बंद ठेवणेबाबत अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी सर्व संबंधितांना पत्रान्वये कळविले आहे.