धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त प्राणायाम आणि योगासने घेण्यात आली. शाळेचे योगशिक्षक डी.के.चौधरी यांनी योगाभ्यासाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांना प्राणायाम आणि योगासनांचे धडे दिले.
धरणगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश ए.ए.ढोके आणि न्यायालयाचे कर्मचारी वर्ग यांनीही योगा दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरूण कुलकर्णी आणि सचिव डॉ.मिलिंद डहाळे यांच्या हस्ते न्यायाधीश ढोके यांचा बुक, बुके आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक डॉ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.