धरणगाव (प्रतिनिधी) आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी चिकित्सकपणा व वैचारिक दृष्टिकोन निर्माण करणे काळाची गरज आहे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष रामानुजन मॅथ फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर चंद्रमौली जोशी यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील आनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयात “मनोरंजनातून शिकवू या गणित विज्ञान”या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष रमेश खंडू महाजन होते तर प्रमुख व्याख्याते डॉक्टर चंद्रमौली जोशी व जळगांव विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव काशिनाथ मिस्तरी, मुख्याध्यापक एम एच चौधरी उपस्थित होते.
शाळेच्या वतीने मान्यवरांचा स्वागत व सत्कार शाल,श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक बी आर महाजन यांनी करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच सुनील वानखेडे यांनी कार्यशाळेचे ध्येय व उद्दिष्टे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर डॉक्टर चंद्रमौली जोशी यांनी गणित विज्ञान विषयासंदर्भात मनोरंजक पद्धतीने विविध प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले…, अगदी नृत्यातून गणित कसे शिकवता येईल याचे प्रात्यक्षिक मनोरंजक पद्धतीने करून दाखवले. यावेळी आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एम एच चौधरी, ए के पाटील, बी आर महाजन, आर बी महाले, कल्पेश वारुळे, किरण महाजन,बी डी सुतार, पी एन माळी आदींचे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए के पाटील यांनी केले तर आभार आर बी महाले यांनी मानले.