धरणगाव (प्रतिनिधी) येथे लांडगे गल्ली येथील जय भवानी मित्र मंडळातर्फे विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा तसेच लांडगे गल्ली शाखा येथील चंद्रकांत जाधव व लहान माळी वाडा येथील किशोर महाजन यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
धरणगाव शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी सल्लागार सदस्य(आत्मा)पदी निवड झाल्याबद्दल उषाताई गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्षा यांची तालुका आत्मा कमिटीवर, वाल्मिक पाटील यांची तालुका आत्मा कमिटीवर, धीरेंद्र पुरभे यांची दक्षता समितीवर, बाळू जाधव यांची रेल्वे सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे,राजेंद्र महाजन, वासुदेव चौधरी, विलास महाजन, प्रकाश पाटील, बाळू जाधव, धीरेंद्र पुरभे, प्रकाश जाधव, छोटू जाधव, कैलास धनगर, अशोक देशमुख, वाल्मीक पाटील, पप्पू कंखरे, नंदू पाटील, योगेश पी.पाटील, नगराज पाटील, लक्ष्मण माळी, पिंटू जाधव, आप्पा पवार, विनोद रोकडे, शाम पाटील, जीजाब देशमुख, अरविद्र चौधरी, दिनेश देशमुख, महेंद्र माळी, प्रसाद पाटील, रोहित जाधव, हरी चौधरी, गट्टू गुजराथी, वेदांत बोरसे आदी उपस्थित होते.