TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ : आमदार सत्यजित तांबे !

गांधी नेहरूंच्या विचारावर देश उभा !

vijay waghmare by vijay waghmare
October 6, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विचार निर्भयता आणि नैतिकता शिकवतो. हा विचार घेऊन युवकांनी राष्ट्रबांधणीसाठी काम करावे. गांधी आणि नेहरूंच्या विचारावर देश उभा आहे . हा विचार जोपासणारी जयहिंद लोकचळवळ ही राज्यभरातील तरुणांसाठी मोठे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

जैन हिल येथील गांधी तीर्थ येथे जयहिंद लोकचळवळ व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंडोनेशियाचे गांधीवादी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन, संस्थापक अध्यक्ष मा. आमदार डॉ.सुधीर तांबे ,सचिन इटकर, संकेत मुनोत, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन ,डॉ. आश्विन झाला , डॉ रवींद्र वानखेडे, सौ दुर्गाताई तांबे, शैलेंद्र खडके आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सुदृढ निरोगी समाज बनवण्यासाठी 1998 मध्ये जय हिंद लोकचळवळीची स्थापना झाली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात ,राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे यांनी माणसांना जोडण्याचे संस्कार दिले यातून मी युवकांना जोडत गेलो. आणि आज ही चळवळ राज्यभर पोहोचली आहे. समाजामध्ये अंधश्रद्धा ,जातीभेद, अस्वच्छता रूढी परंपरा यांचे मोठे प्राबल्य असून या सर्वांच्या विरुद्ध लढण्यासाठी रचनात्मक विचार जय हिंद च्या माध्यमातून दिले जात आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नैतिकतेचा विचार माणसाला निर्भय बनवतो. गांधी व नेहरूंच्या विचारावर हा देश उभा असून गांधींनी भारताला भारत पण दिले.

छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्वराज्य व रयतेच्या कल्याणाचा एकच विचार असून सर्वधर्मसमभाव जोपासत शेतकरी व गोरगरिबांच्या कल्याणाचे राज्य निर्माण व्हावे हा विचार त्यांचा आहे. या विचारातून या तरुणांनी काम असे आव्हान करताना विविध कलागुण व करिअरच्या दृष्टीने राज्यभरातील युवकांसाठी जय हिंद लोकचळवळ हे मोठे आश्वासक व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.

तर पद्मश्री इंद्रा उदय म्हणाले की, गांधी विचार सर्व दूर पोहोचवणारी ही जय हिंद लोक चळवळ असून देश प्रेमाने भारवलेले तरुण येथून निर्माण होत आहेत. भारत व इंडोनेशिया मधील संबंध अधिक दृढ करण्याचे काम जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर मा. आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की राज्यघटनेला अपेक्षित निकोप समाज निर्माण व्हावा यासाठी जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून काम होत आहे. सध्या देशामध्ये विषारी वातावरण असून राजकीय नेतृत्व कसे करावे ही गांधीजींच्या विचारातून कळते. हा विचार जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जैन उद्योग समूहाने उभारले गांधी तीर्थ हे सर्वांसाठी ऊर्जा देणारे प्रेरणास्थळ असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रमोद चुंचूवार यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 300 युवक व युवती तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक बुलढाणा, अहमदनगर , औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चारित्र्यसंपन्न युवक घडवणारी जयहिंद लोकचळवळ -आमदार थोरात !

स्वर्गीय भवरलाल जैन यांनी गांधी विचारांचा पाया कायम ठेवून हा जैन उद्योग समूह सुरू केला. त्या माध्यमातून सुरू असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे जैन हिल येथील गांधी तीर्थ हे भारतातील अत्यंत सुंदर स्मारक आहे. डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवकांना चारित्र्यसंपन्न घडवणारी जय हिंद लोक चळवळ ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाते आहे. याचा आनंद आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून राज्यभरातील अनेक युवक या परिषदेला उपस्थित राहिले गांधी विचार आणि राष्ट्रहिताचा विचार घेऊन हे सर्व युवकांनी काम करावे असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दूर प्रणालीद्वारे सर्वांशी संवाद साधताना व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJaihind Lokchaval is a big platform for youth--MLA Satyajit Tambe

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; मारवड पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निरापराध व्यक्तींना न्याय मिळण्याबाबत पोलीस प्रशासनास निवेदन

November 20, 2020

प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जमीन ईडीने केली जप्त : किरीट सोमय्या यांचा दावा ! ​​​​​​​

January 10, 2021

चाळीसगाव येथे ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने ट्रॉली उलटून दोन मजूर जागीच ठार

March 7, 2021

फेसबुकवर आमदार संजय सावकारे यांची बदनामी ; एकाविरुद्ध गुन्हा !

April 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group