धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चोरगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत जलकुंभ तसेच मारुती मंदिर सभागृहाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची दाहकता वाढली आहे. अशात ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागु नये म्हणून चोरगावसह पंचक्रोशीतील नागरीकांची तहान भागवण्यासाठी जलजीवन मिशन त्यांच्या गावांपर्यंत आणले आहे. त्यासाठी लवकरच जलकुंभ बांधले जाणार आहे. परिणामी काही महिन्यातच नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या प्रयत्नांमधून ही कामे सुरू आहेत.
भुमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी गावाचे सरपंच ज्ञानेश्वर-नानाभाऊ जीवराम सोनवणे, उपसरपंच प्रवीण रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य जगन बुधा सोनवणे, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष दत्तात्रय रघुनाथ ठाकरे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष प्रेमराज उदाराम सोनवणे, रामचंद्र दीपा खैरनार, हिरालाल किसन सोनवणे, पितांबर आनंदा सोनवणे, शांताराम प्रल्हाद सोनवणे, नवल शिवराम सोनवणे, कालू किसन पवार, ज्ञानेश्वर एकनाथ पवार, धुडकू गोबा पवार, पंढरीनाथ किसन पवार, विनोद शामराव कुंभार, रामरतन बुधा सोनवणे, शांताराम राजाराम बाविस्कर, तुकाराम विठ्ठल मिस्त्री, ज्ञानेश्वर भास्कर सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते. येणाऱ्या काळात गावातील समस्या सोडवल्या कायापालट करण्याची ग्वाही यावेळी प्रतापराव पाटील यांनी दिली.