जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरून तलावाजवळील बगीच्यात अवैधपणे चिलममध्ये गांजा भरून नशा करणाऱ्या दोन व्यक्तींवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ३० जानेवारी रोजी कारवाई केली. या कारवाईत आरोपी मेहमूद शेख (वय-५८) आणि रऊफ सत्तार बागवान (वय-६०) यांच्याकडून गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
शहरातील मेहरूण तलावाच्या बाजूला असलेल्या बगीच्या जवळ काही व्यक्ती चिलममध्ये गांजा भरून नशा करत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मेहरून परिसरातील बगीचा जाऊन संशयित आरोपी मेहमूद शेख इस्माईल शेख (वय-५८), रा. गेंदालाल मिल, जळगाव आणि रऊफ सत्तार बागवान (वय-६०) रा. तांबापुरा या दोघांवर कारवाई करत त्यांच्याकडून गांजा आणि इतर साहित्य जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिलाल पाटील आणि विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करीत आहे.