जळगाव (प्रतिनिधी) मनसे रस्ते आस्थापनाचे राज्य उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी आज जिल्हा कार्यकारणीला स्थगिती दिली आहे. ते आजपासून जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाचे प्रमुख संघटक योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा कार्य अहवाल तसेच त्यांच्या सूचना व समस्या जाणून घेणेकरिता जिल्ह्याचा दौरा राज्य उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी आजपासून सुरु केला आहे. जिल्ह्यातील सद्य परिस्थिती पाहता त्यांनी जिल्ह्यातील कार्यकारणी पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती दिली आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अतुल पाटील यांनी याबाबतची माहिती कळवली आहे.