जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील उर्दू माध्यम प्रतिनिधी व उर्दू सोशल मीडियाच्या माध्यमाने सेवा देणारे पत्रकारांचा जळगाव जिल्हा मानियार बिरादरीतर्फे शाल व समूर्ती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या ३५ वर्षात पहिल्यांदाच एखाद्या संघटनेने जळगाव जिल्ह्यातील विविध उर्दू वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांना त्यांच्या सेवांचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान केल्याबद्दल वरिष्ठ पत्रकार अली अंजुम रिझवी यांनी बिरादारीचे कौतुक केले. ‘ईद ए मिलाद’च्या निमित्ताने पतंत्रकार भवन येथे “इस्लामच्या पैगंबरांचे पवित्र जीवन” या विषयावरील परिसंवाद ठेवले होते. या परिसंवादाचे वक्ते डॉ. रफिक पारनेरकर, डॉ. इकरम खान आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष काझी शहर मुफ्ती अतीक-उर-रहमान होते. त्यांच्या हस्ते या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. मानियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी या पत्रकारांची सेवा थोडक्यात विशद केली.
मागील तीस दशकापासून सेवा देणारे अली अंजुम रिझवी, सईद पटेल व अकिल ब्यावलीसह संवाददाता उर्दू टाइम्स सईद पटेल, एशिया एक्सप्रेस संवाददाता सलाहुद्दीन आदिब, एशिया एक्सप्रेस संवाददाता कामिल शेख, सय्यद जुल्फिकार, आयआयएन एजाज खान, रहमानी पोर्टलचे हाफिज शफीक रहमानी, झी सलामचे आसिफ शेख, औरंगाबाद टाइम्सचे झियान अहमद शेख, व्हायरल न्यूज चॅनेलचे रिझवान फलाही आणि नदवी व्हायरल न्युज चे मुफ्ती हारून यांचा समावेश होता.