TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : केमिकल कंपनीतील स्फोटातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू ; मृतांची संख्या चार !

कंपनी मालकासह व्यवस्थापकाला अटक ; दोन दिवसाची कोठडी !

vijay waghmare by vijay waghmare
April 19, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) औद्योगिक वसाहती परिसरातील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगार ठार तर २२ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. यात जखमी असलेल्या दोन कामगारांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४ वर पोहचली आहे. दरम्यान या घटने प्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज कंपनीच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील प्रशासकीय अधिकारी मात्र फरार आहे.

दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीत आग लागल्याची घटना दि.१७ रोजी सकाळी घडली होती. अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली होती. तर आगीत होरपळलेल्या कामगारांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. आज उपचारा दरम्यान दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यात किशोर दत्तात्रय चौधरी (रेणुकानगर, रामेश्वर कॉलनी) व दिपक वामन सुहा (विठोबानगर) असे मयतांचे नाव आहे.

कंपनी मालकासह व्यवस्थापकाला अटक

कंपनीतील स्फोटप्रकरणी कपिल राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक लोमेश सुकलाल रायगडे, प्रशासकीय अधिकारी अनिल गुलाब पवार या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधासह कलम २२५, २८३, २८५, ३३७, ३३८ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कंपनी मालकासह व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असुन दोघांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुलांचे यश पाहण्यापुर्वीच किशोर चौधरींवर काळाची झडप !

एमआयडीसीतील कंपनीत स्फोट झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी किशोर चौधरी यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालावली आहे. किशोर चौधरी हा गेल्या दोन ते तीन वर्षापासून कामाला होता. तर त्यांच्या पत्नी देखील याच कंपनीत काम करत आहे. किशोर व त्यांच्या पत्नी दोन्ही याच कंपनीत काम करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. त्यांना दोन मुले असुन ते स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. मुलांच्या शिक्षणाला कुठली ही अडचण येवू नये म्हणून ते दोन्ही कंपनीत काम करत होते. मुले स्पर्धा परिक्षा पास व्हावे असे स्वप्न मनी बाळगुण जीवापाड मेहनत करणाऱ्या किशोरने पैसे न खर्च करता आज ही पत्र्याच्या घरात राहत होते. मुलांचे यश पाहण्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

घराचा ‘दिपक’ हिरावला !

दिपक साहू या कर्मचाऱ्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी घेवून जात असतांना नाशिक जवळच त्यांची प्राणज्योत मालावली. दिपक साहु हा घरातील एकुलता एक व कष्टाळू मुलगा होता. त्याच्या परिवारात आई, वडील व दोन बहिनी आहे. एक बहिण कौटुंबिक वादामुळे माहेरीच राहत होत्या. संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी एकुलत्या एक दिपकवर होती. मात्र दिपकचा आज मृत्यू झाल्यानंतर बहिणीसह आई वडीलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

मेहुणबारे-दहिवद जिल्हा परिषद गटात विकासाला गती मिळणार : आमदार मंगेश चव्हाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, 28 डिसेंबर 2023 !

December 28, 2023

सिंधी कॉलनी युवतीच्या आत्महत्याप्रकरणी झिरो पोलीस विरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2021

पाचोऱ्यात धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली !

December 23, 2022

जेवणाच्या पंगतीतून उठवल्याच्या राग ; तरूणावर चाकूहल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा !

May 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group