जळगाव (प्रतिनिधी) भाजीपाला व्यवसाय करतांना ओळख होवून घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते. या संबंधाचे रुपांतर अनैतिक संबंधात होवून वाद झाला. त्यातून महिलेच्या डोक्यात वजन माप टाकून चाकूने वार करीत ओढणीने गळा आवळून खून करणाऱ्या सुरेश सुकलाल महाजन (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी) याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
शहरातील रामेश्वर कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ मयत वंदना गोरख पाटील ह्या वास्तव्या होत्या. त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. आरोपी सुरेश महाजन हा देखील भाजीपाला विक्री करत असल्याने त्यांची ओळख होवून घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंधही बहरले. यामुळेच आरोपी सुरेश महाजन याचे वंदनाबाई यांच्या घरी येणे-जाणे सुरु झाले होते. महिलेच्या पतीचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे महिला व तिचा मुलगा दीपक हे दोघेच घरी राहत होते.
मुलाचे लग्न झाल्यानंतर तो पत्नीसोबत उदगीर येथे नोकरी निमित्ताने निघून गेला होता. त्यामुळे मयत ही घरात एकटीच राहत होती तसेच आरोपी सुरेश हा नेहमी तिच्या घरी येत होता. २६ ऑगस्ट २०२१ च्या रात्री रामलाल पवार यांच्याकडे दोघांनी ठेवलेले पैसे घेण्यासाठी महिला व सुरेश महाजन हे गेले. दोघेही जण पैसे घेऊन निघून गेले. त्याच रात्री महिलेच्या घरी महाजन याने अर्धा किलो वजनाच्या मापाने, चाकू तसेच ओढणीच्या सहाय्याने गळफास देत महिलेचा खून केला होता. या प्रकरणी महाजनविरुद्ध
या प्रकरणी न्यायालयात कामकाज झाले. यात मयताचा मुलगा दीपक, साक्षीदार रामलाल पवार, वैद्यकीय अधिकारी तसेच शेजारी राहणारे साक्षीदार यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. मयताचा मुलाने आरोपी व त्याची मयत आई वंदना हे बऱ्याच वर्षापासून पती-पत्नी सारखे राहत असल्याचे त्याने जबाबात सांगितले. विशेष म्हणजे आरोपी व मयत रात्री सोबत असल्याने महिलेच्या अंगावरील जखमा कशाच्या व कशामुळे झाल्या व महिला कशामुळे मयत झाली, याचे स्पष्टीकरण देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला दोषी ठरविण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश-१ एस. एस. सापटणेकर यांनी महाजन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास असा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले. गुन्हा सिद्ध होण्यासाठी पोहेकॉ राजेंद्र कांडेकर, दीपक चौधरी, केस वॉच विशाल कोळी यांनी मदत केली.