TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने सभागृहात उपस्थित केले प्रश्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खरेदीत कोट्यांवधीचा घोटाळा झाल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी केली होती. याप्रकरणी शिवसेनेचे पदवीधर मतदार संघाचे आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सविस्तर उत्तर दिले आहे.

आमदार विलास पोतनीस यांनी उपस्थित केले चार प्रश्न

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

जळगाव जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदीत गैरव्यवहार झाल्याबाबत आज शिवसेनेचे पदवीधर मतदार संघाचे आमदार विलास पोतनीस यांनी चार प्रश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना उपस्थित केले होते. (१) जळगाव जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नियंत्रणाखाली ३० व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय?. (२) असल्यास सदर खरेदी प्रक्रिये प्रकरणी चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे काय?. (३) असल्यास समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय, सदरहू अहवालात कोणत्या शिफारसी करण्यात आल्या आहेत आणि तद्नुषंगाने दर्जाहीन व्हेंटिलेटर पुरवून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित कंपनीवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे. (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली ही उत्तरं

(१) जळगाव जिल्ह्यामध्ये यंत्रणा स्तरावर ३० व्हेंटिलेटर खरेदीमध्ये अनियमितता झाली असल्याबाबतचे जिल्हाधिकारी जळगाव यांचे दिनांक २३/०८/२०२१ रोजीचे पत्र प्राप्त झाले आहे. (२) सदर प्रकरणी जिल्हास्तरावर चौकशी समिती नेमली आहे. (३) चौकशी समितीने अहवाल सादर केला असून पुरवठा केलेले व्हेंटिलेटर तांत्रिक विनिर्देशानुसार नसल्याचे आढळल्यामुळे खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. (४) प्रश्न उद्भवत नाही.

नेमकं काय-काय खरेदी केलं होते आणि कसा झाला होता घोटाळा

नवजात बालकांसाठी १५ आणि प्रौढ व्यक्तींसाठी १५ असे एकूण ३० व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले होते. मात्र खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची कंपनी आणि किंमतीमध्ये घोळ झाल्याचं माहिती अधिकारातून उघड झाले होते. या खरेदीमध्ये जेईएम पोर्टलवर मॅक्स प्रोटॉन प्लस कंपनीच्या व्हेंटिलेटरची किंमत १२ लाख ३८ हजार ४३१ रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात व्हेंटिलेटरचे बाजार मूल्य ५ लाख ७७ हजार ५०० एवढे आहे. नवजात शिशू आणि मोठ्या व्यक्तींसाठी ३० व्हेंटिलेटर घेण्यात आली. त्यापोटी ३ कोटी ७१ लाख ५४ हजार १३० रुपये एवढा निधी जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळाला. पण नामांकित ब्रँण्डऐवजी दुसऱ्याच कंपनीची मशीन्स (असेम्बल) मागवण्यात आल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे २९ मे रोजी या संदर्भातली निविदा मंजूर झाली आणि २८ जूनपर्यंत व्हेंटिलेटर ताब्यात घेऊन त्यांचा वापर सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र तसे काहीच झाले नाही, असा आरोप सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी यांनी केला होता.

भोळेनी पोलिसात नोंदावली ऑनलाईन तक्रार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर नसल्याने शेकडो नागरिकांचे बळी गेले होते. यामुळे राज्यात सरकारने व्हेंटिलेटर अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी व्हेंटिलेटर खरेदी करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला देण्यात आले होते. पण या अधिकारांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी करत घोटाळा उघडकीस आणला होता. तसेच दिनेश भोळेंनी बुधवारी पोलिसांच्या सीसीटीएनएसला ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. तसेच याची एक प्रत पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा पेठ पोलीस स्थानकात दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा ; चोपड्यात २३ तरुणींची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीसांनंतर एकनाथराव खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट !

June 2, 2021

विवाहितेचा विनयभंग करून परिवारातील सदस्यांना मारहाण ; पहूर पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा !

May 30, 2022

रोटरी क्लब आॕफ जळगाव सेंट्रलच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ वाटप !

November 13, 2020

धरणगावचे पी.डी.पाटील सर महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

December 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group