जळगाव (प्रतिनिधी) कपडे खरेदी करतांना झालेल्या ओळखीतून एका नराधमाने वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, कपडे खरेदी करतांना एका अल्पवयीन मुलीसोबत दीपक सोनवणे (पूर्ण नाव गाव माहित नाही) ओळख झाली होती. यातून त्याने शहरातील फुलेमार्केट येथे वेळोवेळी बळजबरीने शारीरीक संबंध निर्माण केले. तसेच घरी कोणास काही एक सांगीतल्यास तुझ्या आईवडीलांना मारुन टाकेल, अशी पिडीतेस धमकी दिली. यानंतर मे २०२१ मध्ये देखील संशयित आरोपीने मध्यप्रदेशात आपल्या काकाच्या राहत्या घरी बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. तसेच तू जर मला भेटण्यासाठी आली नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेल व तुझ्या वडीलांना मारुन टाकेल अशी धमकी दिली. अखेर पिडीतेने याबाबत एमआयडीसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी दीपक सोनवणे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सपोनी प्रमोद कठोरे हे करीत आहेत.