TheClearNews.Com
Sunday, December 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव तहसील कार्यालयाचे “समाधान शिबीर” 25 मे रोजी संपन्न

"तुमच्या चेहऱ्यावरचं हसू… हेच आमचं समाधान" - पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
May 25, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित ‘समाधान शिबिरा’चे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी त्यांनी प्रशासन व जनतेमधील आपुलकीचा सेतू दृढ करत नागरिकांशी थेट संवाद साधला. “या शिबिराचं नावच ‘समाधान’ आहे… आणि खरं समाधान म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटणं. नागरिकाच्या डोळ्यांत दिसणारं समाधानच आमच्या कार्याचं खरं मोजमाप आहे,” असे भावनिक उद्गार पालकमंत्र्यांनी काढले. “पूर्वी नागरिकांना कामासाठी तहसील कार्यालयात जावं लागायचं; पण आता शासनच त्यांच्या दारी पोहोचत आहे. ही केवळ औपचारिकता नसून प्रशासन व जनतेमधील माणुसकीची नाळ दृढ करणारा उपक्रम आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

जळगाव तहसील कार्यालयाने खोटेनगर येथील दिपलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ‘समाधान शिबिरा’त पालकमंत्री बोलत होते.

READ ALSO

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

यावेळी आमदार राजूमामा भोळे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, नायब तहसीलदार राहुल वाघ, नवीन भावसार, मोनाली लंगरे, नगरसेवक मनोज चौधरी, डॉ. चंद्रशेखर पाटील, सहायक गटविकास अधिकारी सरला पाटील आदी मान्यवर, तसेच विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, तलाठी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“प्रत्येक अधिकाऱ्याच्या एका सहीने एखादं कुटुंब उजळू शकतं. त्यामुळे प्रत्येक तक्रारीकडे फाईल म्हणून न पाहता माणुसकीच्या नजरेतून पाहण्याची गरज आहे. १०० टक्के काम शक्य नसेल… तरी १०० टक्के समाधान देण्याचा प्रयत्न व्हावा,” असा सल्ला अधिकाऱ्यांना देताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, काही कामं लहान वाटली तरी ती संबंधित व्यक्तीच्या जीवनाशी निगडित असतात.

समाधान शिबिरामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, वीज, पंचायत, पाणीपुरवठा आदी विविध विभाग एकाच छताखाली कार्यरत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा वाचतो आणि अनावश्यक मनस्तापही टळतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “सर्कलनिहाय असे शिबिरं राबवून सर्वसामान्य जनतेला न्याय देणे हा उद्देश आहे,” असे सांगून पालकमंत्र्यांनी उपस्थित नागरिकांना दिलासा दिला.

आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, या शिबिरांतून गरजू आणि पात्र जनतेपर्यंत योजना पोहोचविल्या जात असल्याबद्दल समाधान वाटते. या शासकीय योजना गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हे काम फक्त महसूल विभागाचे नाही, तर सर्व विभाग एकत्रितपणे करत आहेत, असेच काम करत रहा.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 135 पात्र लाभार्थ्यांना लाभाचे वाटप

जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांच्या अंतर्गत एकूण 135 पात्र लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. यामध्ये महसूल विभागातील 23 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. कुटुंब अर्थसहाय योजना व विशेष सहाय योजनेतून 23 लाभार्थ्यांना मदत मिळाली. पुरवठा विभागाचे 22 लाभार्थी, विविध प्रकारचे दाखले प्राप्त केलेले 25 लाभार्थी, आरोग्य विभागाच्या योजनांचे 17 लाभार्थी, कृषी विभागाचे 2 लाभार्थी, पंचायत समितीच्या योजनांचे 3 लाभार्थी आणि म.न.पा. जळगाव अंतर्गत 10 लाभार्थ्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी समाधान शिबिराची संकल्पना, उद्दिष्टे व उपयुक्ततेबाबत सविस्तर माहिती दिली. बहारदार सूत्रसंचालन श्री.मिलिंद बागुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोनाली लंगरे यांनी केले.

या शिबिरात महसूल विभागाच्या विविध योजनांचे लाभ, कुटुंब अर्थसहाय योजना, विशेष सहाय योजना, पुरवठा विभाग, आरोग्य व कृषी विभाग, पंचायत समितीच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आ. राजूमामा भोळे यांनी विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन आढावा घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaongulabrao patil

Related Posts

गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
गुन्हे

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025
जळगाव

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

December 19, 2025
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
गुन्हे

नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

December 19, 2025
जळगाव

कौटुंबिक स्नेहसंमेलनाने महावितरण कर्मचाऱ्यांना मिळाली नवी ऊर्जा

December 18, 2025
Next Post

Today's horoscope : आजचे राशिभविष्य 26 मे 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुगार अड्ड्रयावर छापा : ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

October 31, 2020

धुळे येथे ड्रायव्हिंग स्कुल संचालकांच्या विभागीय संवाद मेळाव्याचे आयोजन

October 29, 2021

गांधी जयंतीनिमित्त ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ चे आयोजन

September 15, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन नियुक्त्या जाहीर ; गुलाबराव पाटील यांना मिळाली मोठी जबाबदारी !

July 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group