जळगाव : वाघाच्या कातडीसह तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सहा जणांना अटक !
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नशिराबाद येथील टोल नाक्यावर कस्टम खात्याने केलेल्या कारवाईत वाघाच्या कातडीसह याची तस्करी करणार्या टोळीला शुक्रवारी २६ जुलै रोजी सकाळी ८ अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव वनखात्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद टोल नाका येथे वाघांच्या कातडीसह एक टोळी आल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती. यानुसार, शुक्रवारी २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सापळा लावला असता दोन मोटारसायकलींवरून एकूण ६ जण जात असतांना त्यांना अटक करण्यात आली. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या कडून वाघाची कातडी जप्त करण्यात आली. या वाघाची शिकार कुणी व कशी केली याची माहिती समजली नाही. मात्र वाघ हा दुर्मीळ प्राणी असतांना त्याची कातडी जप्त करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, वन खात्याच्या अंतर्गत असलेल्या कस्टम विभागाने या संदर्भात पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये अजवर सुजात भोसले ( वय ३५, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर), कंगनाबाई अजवर भोसले (वय ३०, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर), रहीम_ रफीक पवार (रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर), तेवाबाई रहीम पवार (रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर), मोहंमद अतहर खान ( वय ५८, रा भोपाळ, मध्यप्रदेश) या ६ संशयित आरोपींचा समावेश आहे.