जामनेर (प्रतिनिधी) भरधाव इको कार दुचाकी यांची समोरासमारे धडक झाल्याने दुचाकीवरील मावस भाऊ असलेल्या दोघा तरुणांचा मृत्यू झाला. तर कारचा चालक व अन्य दोघे असे तिघे गंभीर झाले. ही घटना फतेपूर मादी लोणी रस्त्यावर सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
सौरभ कैलास कोळी (वय २५) रा. कोदोली व शुभम दिनकर जाधव (वय २७, रा. शिंगाईत ता. जामनेर) असे मृत तरुणांचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथून वृध्द रुग्णाला जळगाव उपचारासाठी घेवून इको कार जात होती. कारमध्ये वृद्ध महिला पुरूष यांचे नातू व सून असे प्रवासी होते. कार मादणी लोणी गावा पोहचली असता इको कार व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली.
अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकी चालक सौरभ कोळी याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला शुभम जाधव हा गंभीर जखमी झाला. त्यांना स्थानिक नागरिक व फत्तेपूर पोलिसानी उपचारासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात रवाना केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहीती मिळाली. तसेच इको कारचे चालक मंगेश संतोष कोळी व गाडीतील प्रवासी चंद्रकांत जैन व प्रमीला जैन ह्या पण या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू असल्याची माहीती मिळाली. या अपघातात दुचाकीचे दोन तुकडे झाले असून कारचाही समोरील भाग चक्काचूर झाला आहे, अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याच भयंकर दृश्य यावेळी पाहायला मिळालं.